धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपाचे उत्तर मुंबई जिल्हयाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक गणेश खणकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन खणकर यांचा सत्कार केला. यावेळी उत्तर मुंबई जिल्हयातील कामगारांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा झाली व तेथील कामगारांच्या समस्या अभिजीत राणे यांनी जाणुन घेतल्या.
top of page
bottom of page
Comments