Prominent Labour Leader Abhijeet Rane (Founder & General Secretary-DKU) Visited Hasmukh & Co. PG
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक कामगार युनियनचे प्रतिनिधीत्व स्वीकारलेल्या हसमुख अॅण्ड कंपनी पी.जी. च्या कामगारांच्या प्रश्न व समस्यांसाठी मंगळवार दि. 23 फेब्रुवारी, 2021 रोजी काळबादेवी येथील हसमुख कंपनीच्या मुख्य कार्यालयात कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावेळी श्री सत्यविजय सावंत (युनिट अध्यक्ष), सुदीप पवार (युनिट खजिनदार) , शैलेष वेंगेुर्लकर व अन्य कामगार उपस्थित होते. अभिजीत राणे यांच्या येण्यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.







