Prominent Labour Leader Abhijeet Rane (Dhadak Kamgar Union) meeting with Shailesh Devre (RFO- SGNP)
विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी श्री शैलेष देवरे (रेंज फाॅरेस्ट आॅफिसर -संजय गांधी राष्ट्रीय उद्यान)यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटी दरम्यान विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कामगारांचे पगार गेले दोन महिन्यांपासुन झाले नाही या बाबत श्री शैलेष देवरे (रेंज फाॅरेस्ट आॅफिसर -संजय गांधी राष्ट्रीय उद्यान)यांना पत्र दिले. तसेच कामगारांच्या इतर प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. श्री शैलेष देवरे यांनी आश्वासन दिले की कामगारांचे थकबाकी पगार लवकरात लवकर देण्यात येईल.



