जैन साधू साध्वी याना कोरोना लस देण्याची आरोग्य विभागाकडे मागणी
मुंबई : जैन साधू साध्वी याना कोरोना लस देण्यासाठी अभिजित राणे फाउंडेशनच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे याना पत्र दिले आहे
राज्यात कोरोना विषाणूंच्या प्रादूर्भावामुळे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात असुन महाराष्ट्रात तीन ते चार हजार जैन साधू साध्वी असुन त्यांच्याकडे कोरोना लसिकरणासाठी लागणारे कागदपत्रे नसल्या कारणाने त्याना लस घेण्यास बाधा येत आहे यासाठी अभिजित फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित राणे यानी पुढाकार घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे याना भेटून पत्र दिले यावर शेरा देत आरोग्य विभागाला पाठविले असुन या बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे राणे यानी सांगितले असुन लवकरच आपण महापालिकेचे काकाणे याना देखील भेटून लवकरात लवकर भेटून लसीकरण करण्याचा प्रयत्नात आहोत

Comments