धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज नाशिक दौऱ्या दरम्यान युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष करण गायकर यांच्या वाढदिवस सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
छावा संघटना व छावा क्रांतीवीर सेनेचे कार्य समाजासाठी प्रेरक - नामदार राजेश टोपे
सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे नववर्षाच्या मुहूर्तावर छावा मराठा संघटनेचा अठ्ठाविसावा छावा क्रांतीवीर सेनेचा आठवा वर्धापन दिन सोहळा व विलास भाऊ पांगारकर तसेच करण गायकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला
सकाळी ठीक दहा वाजता प्रमुख पाहुणे माननीय श्री अभिजीत राणे विख्यात कामगार नेते छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व छावा मराठा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या हस्ते फित कापून ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली येथील संत हरीबाबा मैदानात या कार्यक्रमाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर covid-19 लसीकरण करण्यात आले
यावेळी कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कामगार नेते मुंबई मित्र समूह संपादक अभिजीत राणे किशोर चव्हाण विलास पांगारकर करण गायकर आमदार हिरामण खोतकर माजी आमदार राजाभाऊ वाजे ज्येष्ठ नगरसेवक उद्धव निमसे नगरसेविका हेमलता कांडेकर नाशिक माणिक देवरे मनोज जरांगे पाटील छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्यकारणी मधील राजेश मोरे प्रा उमेश शिंदे शिवा तेलंग शिवाजी राजे मोरे विश्वनाथ वाघ नवनीत महाराज गोरले नितीन शिंदे अनिल राऊत पंकज जराड धनराज लटके पांडुरंग मोरे नवनाथ शिंदे ज्ञानेश्वर थोरात सौ वंदना ताई कोल्हे श्री मेसवाला छाया खैरनार रामेश्वर बावणे गणेश माने किरण बोरसे वैभव दळवी राम भाऊ जाधव नाना कदम प्रवीण जाधव जगन पाटील भाबड रमेश आप्पा पांगारकर राजू देसले भिकन आबा शेळके राम जाधव पुणे अशोक करावे रवी भांबरे राजेश विक्रांत विठ्ठल राजे भोसले परमेश्वर नरोडे शिवाजी ठोंबरे एडवोकेट राजेसाहेब पाटील डॉक्टर अशोक म्हात्रे शैलेश ठाकूर अविनाश म्हात्रे प्रमोद जाधव तसेच विशाखापट्टणम येथील किशोर जी आदींसह सौ छाया पांगारकर उपस्थित होत्या
दोन्ही संघटनेच्या 28 व्या व 8 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्हे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मराठा रत्न व मराठा मित्र पुरस्कार प्रधान करण्यात आले यामध्ये एडवोकेट राजे पाटील सिन्नर चे माजी आमदार राजाभाऊ वाजे उद्धवजी निमसे नगरसेवक ॲडव्होकेट राजे पाटील विठ्ठल राजे भोसले राजू देसले दिनकर कांडेकर प्रमोद जाधव नितीन रोटे पाटील सोमनाथ जाधव सचिन पवार परमेश्वर नाईकवाडे संजय तुपलोंढे आदींना देण्यात अशोक स्तंभ असलेले सन्मान चिन्ह देण्यात आले
तर शहीद कुटुंबीयांसाठी सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कुटुंबांना गौरविण्यात आले यामध्ये भाऊसाहेब पगार सोमनाथ पगार वसंत लहाने राकेश आणेराव श्रीकांत बोडके संदीप ठोक केशव सोनगिर शंकर हगवणे शहिदांच्या कुटुंबांना सत्कार करण्यात आला
तसेच तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनीही यावेळी क्रीडा कला सामाजिक या क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्यात आले त्यामध्ये रमेश आप्पा पांगारकर वानखेडे चिंतामण पाटील आकांक्षा खामकर रिया कानडे अपूर्वा पांगारकर दुर्गा जाधव राष्ट्रीय खेळाडू त्याचप्रमाणे अशा वर्कर यांना कोरडा काळामध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे काही कारणानिमित्त उपस्थित न राहू शकल्यामुळे त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे छावा संघटना व छावा क्रांतिवीर सेना या दोन्ही मिळून आज तो कार्यक्रम केला कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले यासारख्या कार्यक्रमात रक्तदान शिबिर लसीकरण मोहीम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले संपूर्ण महाराष्ट्रात साडेआठ कोटी लसीकरण पहिला डोस पूर्ण झालेला असून एकूण 14 कोटी लसीकरण महाराष्ट्रात झालेले आहे आजच्या काळात रक्तदान हे महत्त्वाचे असून या संघटनेच्या माध्यमातून ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे त्यांनी तोंड भरुन कौतुक केले व अभिनंदन केले मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण नोकरी आरक्षण मिळावे यासाठी मी आग्रही आहे राणे समितीत काम केलेला मी एकमेव असून टक्के आरक्षण मिळावे ही माझी ही वैयक्तिक मागणी आहे व मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मी कटिबद्ध आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी जरी उपस्थित राहू शकलो नाही तरीपण पुढील कार्यक्रमासाठी मी निश्चितपणे येईल असे त्यांनी जाहीर केले व सर्वांचे आभार मानले तसेच
कामगार नेते अभिजीत राणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की करण गायकर हे माझे लहान भाऊ आहेत तर विलास भाऊ हे माझे मोठे बंधू आहेत दोन्ही नेते समाजासाठी अहोरात्र काम करत असतात दोघेही समाजाचे प्रामाणिक सेवा करत असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमास येताना आनंद वाटतो अतिशय तळमळीने समाजाचे प्रश्न ते मांडत असतात मी ज्या ज्या वेळी त्यांच्या कार्यक्रमासाठी आलो त्या त्या वेळी शेतकऱ्यांचे कामगारांचे मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न मला दिसत असतो मलाही कायम ते वेळोवेळी सांगत असत आपण आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मराठा समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडत सरकार दरबारी आपल्या लिखाणाची योग्य दखल घेतल्या जाते त्यामुळे समाजासाठी आपण ते करावे आणि मीही माझ्या परीनं समाजासाठी जे काही करता येईल ते करत असतो या दोन्ही नेत्यांना माझ्याकडून भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
या कार्यक्रम प्रसंगी आरोग्य मंत्री राजेश टोपे त्यांनी जे मोलाचे मार्गदर्शन केले याचा मी आभारी राहील असे पांगरकर यांनी त्यांच्या भाषण प्रसंगी सांगितले टोपे साहेब यांनी आज मंत्रिपदावरून जे काम करून दाखवलेले आहे ती खुर्ची स्वतःसाठी नाही तर समाजाच्या कामासाठी दिलेली आहे त्यांनी आशा वर्कर साठी आपली जी मागणी आहे ती पूर्ण करण्याची हमी दिली आहे यावेळी मराठा मित्र पुरस्कार देऊन टोपे साहेबांना गौरविण्यात आले त्याचा त्यांनी आदरपूर्वक स्वीकार केला
या कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक करताना पांगरकर यांनी सांगितले की जावळे पाटील वडजे पाटील किशोर चव्हाण या सारख्या लोकांनी माझी ओळख महाराष्ट्राबाहेर करून दिली या लोकांच्या साथीने मी आज अनेक समाजोपयोगी कामे करण्यात पुढे राहिलो आहे मी समाजातील गुन्हेगारी सारख्या प्रवृत्तींना आळा घातला अनेक व्यवसायिकांना व्यवसायामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले अनेक समाजसेवकांना समाजसेवक कामासाठी मदत केली वेरूळ सारख्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक बांधण्यात आम्ही पुढे काही लोक मराठा समाजाला बलिदान देणारे सर्वांना मराठा रत्न पुरस्काराने प्रीत करतो विशाखापट्टणम येथील किशोरजी यांना मराठा पुरस्काराने यावेळी प्रदान करण्यात आली मराठा समाजाची पुढील दिशा आम्हाला महत्त्वाची आहे कर्नाटकातील शहिदांना आदरांजली देण्यात आली व गौरव पुरस्कार मिळाला 266 मुलांना नोकरीत सामावून घेतले 10 लाख रुपये शहिदांना मिळवून देण्यात मी अग्रेसर राहिलो या कामांसाठी मी रडत नाही तर लढत राहणार हेच माझे ध्येय असल्याचे पांगारकर यांनी सांगितले
यावेळी करण गायकर यांनी सांगितले की यापुढे मराठा समाजाचे तरुण आम्हाला गमवायचे नसून पुढील काळात ते कमवायचे आहे यासाठी जरांगे पाटील आपल्याला अनेक तरुण घडवायचे आहे असे गायकर यांनी सांगितले पुढे बोलताना त्यांनी सांगितले की समाजाच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कामगारांच्या न्याय हक्कासाठी आमच्या संघटना नेहमी अग्रेसर असतील ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी त्या अन्यायाला वाचा फोडून शोषित वर्गाला न्याय देण्याचे काम येणाऱ्या काळात होईल आमच्यासोबत जे राज्यभरातील लोक काम करतात त्यांच्या माध्यमातून सरकार कोणाचेही असो चुकले तर चुकीला चूक आणि चांगले काम केले तर मोकळ्या मनाने त्यांचे अभिनंदन केले जाईल यापुढे राज्यकर्त्यांनी र्वसामान्य जनतेला वेड्यात काढण्याचे काम बंद करावे मराठा समाजाच्या उर्वरित मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात शेतकऱ्यांसाठी ज्या योजना केंद्र व राज्य सरकारने अमलात आणले आहेत त्याची अंमलबजावणी तळागाळापर्यंत झाली पाहिजे यासाठी यंत्रणा उभ्या केल्या पाहिजे येणाऱ्या काळात त्यासाठी आम्ही सर्वजण काम करू असा निश्चय नवीन वर्षाच्या सुरुवातीला केला तसेच यावेळी ह्या मेळाव्यासाठी उपस्थित सर्व समाज बांधवांचे आम्ही ऋणी राहू असे शेवटी त्यांनी सांगितले
या कार्यक्रम प्रसंगी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून अनेक मान्यवरांनी हजर राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट मयूर पांगारकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छावा मराठा संघटनेच्या व छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली राज्यभरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
Comments