Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Jiddi Maratha Pratishthan Navratrotsav
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी नर्मदा नगर भायंदर पूर्व, जिल्हा ठाणे येथे जिद्दी मराठा प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्रोत्सवात उपस्थिती लावली. यावेळी जिद्दी मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप जंगम यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते यांना श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार बी.के.पांडे, धडक कामगार युनियन महासंघाचे महाराष्ट्र सचिव विन्स्टन परेरा व गिरीराज शुक्ला (महाराष्ट्र संपर्क अधिकारी -धडक माथाडी जनरल कामगार युनियन’) उपस्थित होते.






