पाच राज्यात भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल व होळीचे औचित्य साधून मालाड मालवणी येथे आयोजित केलेल्या स्नेह कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे आयोजन वार्ड क्र. 51 चे विशाल भगत यांच्या मार्गदर्शनाने व उत्तम विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे उत्तर मुंबई अध्यक्ष प्रदीप गौड यांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.









Comments