Prominent Labor Leader Abhijeet Rane meeting with The Hon'ble Opponent Leader Shri Devendra Fadnavis
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी केले कौतुक आणि दिले शुभाशीर्वाद
दै मुंबई मित्र च्या कामगार विशेषांकाचा -हदयस्पर्शी सोहळा
अभिजीत राणे मुंबईच्या कामगार चळवळीतील महानायक - देवेंद्रजी फडणवीस
महाराष्ट्रातील कामगार चळवळीचा इतिहास आणि भविष्य आलेखित करणा-या विशेषांकाने लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला
◆ राज्याचे एकमेव यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते सन्मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'दै. मुंबई मित्र' च्या 'कामगार दिन' विशेषांकाचे प्रकाशन त्यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी देवेंद्रजी फडणवीस यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अभिजीत राणे व देवेंद्र फडणीस यांच्या मध्ये कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. देवेंद्रजी फडणवीस यांनी यावेळी वर्तमान पत्र युनियनला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







