Name board opening of Dhadak Kamgar Union at Vasai East Industrial Area
◆ वसई पुर्व औद्योगिक वसाहतीत कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन
धडक कामगार युनियन वसई-विरारच्या माध्यमातून धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दौरा पार पडला. धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश उत्तम कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा पार पडला. यावेळी वसई पूर्व नवघर येथील औद्योगिक वसाहतीत धडक कामगार युनियनचे फलकाचे उद्घाटन कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, सचिव सिद्धेश तावडे, संजय सिंग, रमेश पांडे आदी उपस्थित होते.



