*उपक्रम: प्रयत्न मदतीचा...!!!*
_सेवा हेच संघटन: भाजपा वसई रोड_
--------------------------------------
◆ दिवस : सहावा
◆ ठिकाण : अंबाडी रोड
◆ दिनांक : 20 मे 2021
धडक कामगार युनियन संलग्न द ट्रक- डंपर टेम्पो असोसिएशनच्या माध्यमातून कामगार नेते सन्मा. अभिजीत राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार यांच्या नेतृत्वाखाली आज वसईतील अंबाडी रोड येथील टेम्पो चालक मालक वर्गास द ट्रक- डंपर टेम्पो असोसिएशन कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क चे वाटप करण्यात आले तसेच सर्व टेम्पो चालकांना सकाळी नाश्त्याची पॅकेट्स वाटण्यात आली. अंबाडी रोड येथील अनेक टेम्पो चालक-मालक वर्गाने 'धडक' चे प्रतिनिधित्व घेतले आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोना त्रिसूत्रीचे पालन करून हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी भाजपाचे वसई रोड मंडळ अध्यक्ष रामानुजम व युनिटचे प्रमुख मनोजकुमार राय, संजय वर्मा, सोनू यादव आदी पदाधिकारी व भाजपाचे शेमल आजगीय, सुरेश हेगडे व टेम्पो चालक-मालक उपस्थित होते.
_(भाजपा शास्त्रीनगर मध्यवर्ती कार्यालय व धडक कामगार युनियन वसई-विरार कडून दररोज अनेक प्रकारच्या मदतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत)_
Комментарии