मराठा तरुणांवर अन्याय होऊ देणार नाही
मराठा समाज नेते अभिजीत राणे यांनी घेतला आक्रमक पवित्रा
मराठा समाजातील पात्र उमेदवारांना न्यय मिळवून देणारच
आंदोलनस्थळी भेट घेऊन अभिजीत राणे यांनी दिले आंदोलनकर्त्यांना आश्वासन
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांसह देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
भविष्य अंधारमय होऊ न देण्याचे दिले आश्वासन
मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती येण्यापूर्वी ज्या निवडप्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत त्यांना व ज्या प्रक्रिया सुरु होऊन अंतिम टप्प्यात आहेत या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे मराठा समाजातील आंदोलकांची मराठा नेते, विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली आणि हा प्रश्न त्वरित मार्गी लागावा यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विनंती करणार असल्याचे आश्वासन दिले. मराठा समाजातील पात्र उमेदवारांचे भवितव्य अंधारमय होऊ देणार नाही. आपण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही अभिजीत राणे यांनी आश्वासनादरम्यान सांगितले.
मराठा आरक्षणासंदर्भातील या याचिकांवरील सुनावणी होईपर्यंत नोकरी भरती न करण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केली. त्यावर करोनाच्या काळात नोकर भरती न करण्याचा निर्णय घेतलेलला आहे. सुनावणी दरम्यान कोणतीही भरती केली जाणार नाही, असं राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
मराठा आरक्षणाच्या कायद्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वी निवड झालेल्या, मात्र कामावर रुजू करून न घेतलेल्या २,१८५ मराठा समाजातील तरुणांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. मराठा आरक्षण कायद्यास ९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. मात्र त्यापूर्वीच राज्यात नोकरभरती सुरू झाली होती. या कायद्यांतर्गत मराठा समाजातील २ हजार १८५ युवक व युवतींची विविध खात्यात निवड करण्यात झाली होती. मात्र नियुक्ती देण्यात न आल्यामुळे त्यांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात आपण त्यांच्यासोबत आहोत. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. या लढ्यात ते एकटे नाहीत. आम्ही सारे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत आहे," असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यासंदर्भात आपण त्यांची भेट घेणार असल्याचे अभिजीत राणे यांनी सांगितले.
यादरम्यान मराठा समाजाचे नेते अभिजीत राणे यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेतली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही, असा निकाल न्या. एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने दिला आहे. घटनापीठाच्या निर्णयानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे. या बाबी गंभीर आहेत."त्यामुळे राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी. देशातल्या 26 राज्यामध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे पुनर्विचार याचिका दाखल केल्यास आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीचा मार्ग सुकर होऊ शकेल." असे अभिजीत राणे यांनी सांगितले
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधात एकूण 13 याचिका करण्यात आल्या आहेत. त्यातली महत्त्वाची याचिका ही जयश्री पाटली यांची आहे. मराठा आरक्षणामुळे 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्याचा त्यांचा मुख्य आक्षेप आहे.
आतापर्यंत 58 भव्य मोर्चे
मराठा आरक्षणासाठी समाजाकडे 58 भव्य मोर्चा काढले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या मोर्च्यांची दखल घेण्यात आली होती. आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्याही केल्या. महाराष्ट्रातला मराठा समाज मागस आहे, हे सिद्ध करणारे पुरावे दिले. उच्च न्यायालयाने या सर्वांची दखल असाधारण स्थिती अशी घेत मराठा समाजाचं आरक्षण कायम ठेवलं होतं.
सरकार अपयशी
फेब्रुवारी महिन्यातच हा खटला 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर चालवावा, अशी मागणी केली होती. त्या मागणीला राज्य सरकारने तब्बल 6 महिन्यांनंतर दुजोरा दिला. मराठा आरक्षण प्रकरण हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे.





Hozzászólások