Labour Leader Abhijeet Rane while felicitating retired workers of Aarey, Worli & Kurla Dairy
- dkusocial
- Jun 30, 2021
- 2 min read
आरे, वरळी आणि कुर्ला दुग्धशाळेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विशेष समारंभात निरोप
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते सत्कार
दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांची लवकरच भेट घेणार
कामगारांचे प्रश्न मांडणार
मुंबई
दि. 30 जून, 2021 रोजी आरे, वरळी आणि कुर्ला मध्यवर्ती दुग्धशाळा येथील शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ आरे मध्यवर्ती दुग्धशाळा, आरे मिल्क काॅलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. हा निरोप समारंभ विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्या उपस्थितीत पार पडला.
आरे, वरळी आणि कुर्ला मध्यवर्ती दुग्धशाळा येथील शासकिय सेवेतुन निवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या निरोप समारंभ प्रभारी व्यवस्थापक आरे, यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या उपस्थितीत मोठया दिमाखात पार पडला. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी दुग्धशाळेतील कर्मचा-यांच्या सर्व अडचणी समजुन त्या सोडविण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा.ना.श्री सुनिल केदार यांची लवकरच भेट घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल अशी कर्मचा-यांना ग्वाही देण्यात आली. तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी धडक कामगार युनियनचे मुंबई अध्यक्ष रामजस यादव हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी युनियन तर्फे आय.डी. कार्ड बेल्ट वाटप करण्यात आले व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच प्रभारी व्यवस्थापक, प्रशासन प्रमुख यांनी सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या सेवा उत्पादनाचा त्वरीत निपटारा करण्यात यावा, अशा सुचना दिल्या.निरोपाचा सत्कार करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पांडूरंग महादेव कांबळे, रामकिशन अप्पाराव शिळके, सुब्रमण्यम आनंदा, रामनंद गेना यादव, ऐलसपति मनोहर , चंद्रमणि यादव, रमाकांत निवृत्ति सोरटे, शिरिश रामचंद्र कुलकर्णी, भगवान गणपति दाभाडे, भाऊ सहदेव पाटिल, वासुदेव थोरात, गिरीजा नडगे, कलावती पाटकर, छाया लोखंडे, उमाकांत जगताप, आर. यादव व इतर कर्मचारी आदींचा समावेश आहे.
तर या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुरेश खंडागळे, रविंद्र जगताप, हेमंत चक्के, झुल्लुर यादव, संजय सोनावणे, महिंद्र गांगुर्डे, टी. सी. चव्हाण, रतिराम यादव, विजय आरणे, सुबेदार यादव, सुभाष तिवारी, चंद्रकांत चव्हाण, कलावती कांबळे, आगडे, मल्लेश, महादेव वळकुंटे, अरुण पाटिल, सुधाकर येडेकर, राजू पाटिल, मिलिंद जाधव, प्रकाश पालांडे, राजेंद्र मुरगशन पी.डब्ल्यु.डी., विजय उबाळे पी.डब्ल्यु.डी. आदी कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.














Comentarios