top of page

Inauguration of Dhadak Kamgar Union's Public Contact Office at Vasai (W), Dist -Palghar

◆ वसईत धडक कामगार युनियनची धडक!


◆ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन


वसई

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात देशात शेतकरी संघटनांसह, भाजपा विरोधी सर्व पक्षांनी भारत बंदची हाक पुरकली असून भारत बंदला पाठिंबा दिला आहे. राज्यात या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असतानाच आज पालघर जिल्हातील शोषित, पिडित कामगारांच्या हक्कासाठी धडक कामगार युनियनच्या वसई जनसंपर्क कार्यालयाचे उद्घघाटन विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले. धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शास्त्रीनगर, इंडीयन ओव्हरसिज बँक जवळ, वसई (प.) याठिकाणी सुरु करण्यात आलेल्या या धडक कामगार युनियनच्या वसई जनसंपर्क कार्यालयातून वसई, विरार, पालघर येथील सर्व शोषित, पिडित संघटीत, असंघटीत, कुशल अकुशल कामगारांच्या हक्कासाठी, न्यायासाठी यापुढे यशस्वी लढा जाणार आहे. यावेळी वसईतील अनेक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे म्हणाले राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा कामगार चळवळीतील दांडगा अनुभव आहे. त्यामुळे धडक कामगार युनियच्या सुरुवातीच्या वाटचालीपासूनच प्रविणजींचे मोठ्या भावाप्रमाणे एक सहकार्य मार्गदर्शन, प्रोत्साहन, आशिर्वाद मिळत राहिले. आणि ते आजही मिळतात. आज वसईत उत्तम कुमार यांच्या माध्यमातून धडक कामगार युनियनचा झंझावात सुरु झालेला आहे. वसई, पालघरमधील १५० हून अधिक सभासदांनी कालपर्यंत धडक कामगार युनियनचे सभासदत्व स्वीकारले आहे. पालघर जिल्ह्यात ४००० हून अधिक कामगार धडक कामगार युनियनशी निगडीत आहे आणि फार चांगले काम युनियनच्या माध्यमातून होत आहे. शोषित, पिडित कामगारांच्या प्रश्नांना घेऊन आपण ही युनियन पुढे आणली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक नामांकत पीव्हीआर, झी समुह, कार्निव्हल कंपन्यामध्ये तसेच शासकीय वन विभाग, आरटीओ, दुग्ध विभागांमध्ये सरकारी मान्यता प्राप्त युनियन म्हणून तेजीने काम करत आहोत. धडक कामगार युनियन कार्यकर्ते तयार करत नाही तर नेते तयार करत त्यांना प्रशिक्षण देते. त्याचप्रमाणे संघ परिवारामध्ये काम करणारे नेते देखील शिस्तप्रिय असता त्यांना शिस्तीत काम करण्याचे एक प्रशिक्षण ज्ञान दिले जाते त्यामुळे उत्तमजींच्या मार्गदर्शनाखाली आमच्या कामगार नेत्यांना आणि कामगारांना शिस्त लागेल. जी वसई विरारमध्ये कधी नव्हते ती उत्तमजी आणि राजनजीच्या मार्गदर्शनाने येईल. असे सांगत त्यांनी उत्तमजींना त्यांच्या कार्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यावेळी बोलताना म्हणाले, वसई जिल्हात सुरु होत असलेल्या धडक कामगार युनियनच्या कार्यालय उद्धाटन सोहळ्यास याठिकाणी धडक कामगार युनियनचे संस्थापक माझे मित्र अभिजीतजी राणे, भारतीय जनता पक्षाचे वसई जिल्हाध्यक्ष राजनजी नाईक व ज्यांच्या मुख्य नेतृत्त्वाखाली या परिसरातमध्ये युनियनचे काम चालणार आहे ते उत्तमजी कुमार, कुणाल जाधव, बी के पांडे व सहकारी, भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युनियनचे कार्यकर्ते, सभासद, पदाधिकाऱ्यांना प्रयत्नांनी हे कार्यालय सुरु झाले. त्यामुळे धडक कामगार युनियनच्या वसई जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज झाले हे सर्वांच्या साक्षीने जाहिर करतो. अभिजीत राणे यांच्या धडक कामगार युनियनच्या नावातच धडक आहे. युनियन क्षेत्रातमध्ये कामगारांचे हित जपत व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये उत्तम व्यवस्थापन ठेवत काम करणारी महाराष्ट्रातील आघाडीची कामगार संघटना म्हणून धडक कामगार युनियनकडे पाहिले जाते. कामगार हा समाजातला महत्त्वाचा घडक आहे जो काबाड कष्ट करतो राबतो, मेहनत घेतो. तो जे काही निर्माण करतो, उत्पादित करतो आणि त्याचा उपभोग आपण सर्वच जण घेत असतो त्यामुळे कामगार जगला पाहिजे, टिकला पाहिजे, कामगारांचे शोषण थांबविले पाहिले असा भूमिकेतून कामगार युनियनचे काम चालते. नाहीतर आपण पाहिले की या देशामध्ये खास करुन आपल्या महाराष्ट्रात मुंबईत अनेक युनियन झाल्या कधीकाळी त्यांना लोकांनी डोक्यावर घेतल्या. पण नेतृत्त्वाच्या हव्यासापोटी काही युनियनच्या नेत्यांनी लोकांना देषोधडीला लावण्याचे काम केले हे या राज्याने पाहिले आहे. आणि अशा परिस्थितीत युनियन चालवत कामगारांना न्याय मिळून देत मालकांवर अंकुश ठेवत या कामगारांचे शोषण होणार नाही ही भूमिका अत्यंत नीटपणे जपतायतं यासाठी मी अभिजीत राणे यांचे अभिनंदन करतो. आज देशामध्ये परिस्थिती बघतायतं, कामगार वर्ग अस्वस्थ असून त्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे त्यांना दिलास देण्याची आवश्यकता आहे. असे ते म्हणाले.

वसई विरारमधील कामगार संघटनांबद्दल बोलताने ते म्हणाले, वसई विरारमधील परिस्थिती पाहिली असता वसई विरारमधील मालकांच्या असोसियेशनचा अध्यक्ष पण तोच आणि कामगार संघटनेचा अध्यक्ष पण तोच. अशा पद्धतीत एकाच वेळी दोघांनाही न्याय देणे शक्य होत नाही. त्यामुळे आज कामगारांचे हित जपणारी युनियन चिमाजी आप्पाच्या पुण्यनगरीत आलेली आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की राजन नाईक यांच्या मार्गदर्शनाने भाजपा भारतीय जनता पक्षाचा पाठींबा राणेंना असणारच आहे. कारण राणेंची ही युनियनसुद्धा भाजपाच्या विचारधारेणे, संस्कारानेच वाढली. त्यामुळे आपला त्यांना फायदा आणि त्यांचा आपल्याला फायदा अशा एका समन्वयातून याठिकाणी काम करायचे आहे. ते काम उत्तम कुमार यांच्या नेतृत्त्वाने नावाप्रमाणेच उत्तम होईल हे मी निश्चित सांगतो. त्यामुळे बेधडकपणे कामगारांसाठी जे करता येईल ते करा माझा त्यासाठी पाठिंबा असेल.

कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या भारत बंद भाष्य करताना ते म्हणाले गेल्या आठवड्यात आपण जाहिराती पाहिल्या की महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र थांबला नाही. आणि आज तेच सरकार महाराष्ट्र थांबवण्याचा प्रयत्न करतयं. त्यामागे भावना प्रामाणिक आहे का तर मुळीच नाही. कारण ज्या शेतकरी कायद्याच्या विरोधात आज देशात आंदोलन, बंदचा पुकारा केला आहे तो पंजाब, हरियाणा अशा एखाद दुसरे राज्य सोडले तर निवडक लोक हे आंदोलन चालवतायंत. देशातील शेतकऱ्यांचा या आंदोलनास पाठिंबा नाही. हा कायदा आहे तो शेतकऱ्यांच्या हिताचा आहे कारण तो शेतकऱ्यांचा दर्जा वाढवणार नाही शेतकऱ्यांना सुरक्षित करणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला हमीभाव देत बलवान करणारा आहे. शेतकरी ताकदववान झाला तर मोदी सरकारचे नाव होईल केंद्र सरकारचं नाव होईल मग आपली दुकानदारी कशी चालणार या राजकीय अभिनिवेषणातून आज देश आंदोलन सुरु आहे. असे म्हणाले.

केंद्र सरकारने सांगितले दोष काय असतील ते चर्चेतून दुर करु. पण एक झाल की दुसरं, दुसरं झाल की तिसरं असं करत आंदोलन मिटवायचे नाही असं करत मोदी सरकारला दोष देण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु या देशीतील लोकांचा मोदींवर १०० टक्के विश्वास आहे. उत्पादक शेतकरी, अन्नदात्यासाठी आयुष्य पणाला लावणारे मोदींचे नेतृत्त्व आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वार कुणी शंका घ्यायची आवश्यकता नाही. त्यांच्या निर्णयावर कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही कारण त्यांचा प्रत्येक निर्णय हा देशहिताचा असतो. आणि हे साऱ्या देशाने पाहिले आहे. लोकांच्या शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, पिडित, शोषितांच्या भल्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी मोदी साहेब मागे हटणारे नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात साऱ्या गोष्टी उघड होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कृषीमंत्री असताना असा कायदा झाला पाहिजे यासाठी सर्व राज्यांना पत्र दिली होती ते पत्र देखील आता मिडियाच्या माध्यमातून बाहेर येत आहे. त्यावेळी काँग्रेसच्या वचन नाम्यात एपीएमसी निरस्थ केल्या पाहिजे असे नमुद करत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतही असे जाहिर केले होते. पण आता मोदी सरकारवर टीका करण्यासाठी दुसरा काही मुद्द नसल्याने आंदोलनाच्या मागून वार करण्याचा केविलवाणा प्रयत्न ही विरोध मंडळी करताय असेही ते म्हणाले.

उत्तम कुमार यावेळी बोलताना म्हणाले, माझे अभिजीत राणे यांच्याशी काही वर्षांपूर्वी भेट झाली होती. वसईत आम्ही दिपावलीनिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करतो ज्यात महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ज्येष्ठ भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असतात पण अनेक नेते, पदाधिकारी काही कामानिमित्त निघून जायचे परंतु मी अभिजीत राणे यांचे त्यावेळी त्यांच्या स्वभाव मी पाहिला की कितीही काम असो, घाई असो ते कार्यक्रम संपेपर्य़ंत सर्व छोट्य़ा- मोठ्या सर्व नेते, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी भेट घेतल्याशिवाय निघायचे नाहीत. त्यानंतर अनेक कार्यक्रमांसाठी माझी आणि त्यांची भेट व्हायची त्यावेळी त्यांनी अनेकदा मला अनेकदा सांगितले की सामाजिक कार्याबरोबरच तुम्ही वसई, विरारमध्ये कामगारांच्या प्रश्नांसाठी, मागण्यासाठी तुम्हीही कामगार चळवळीत सक्रीय व्हा. परंतु मला ते जमणार नाही असे वाटत होते. पण आज वसई विरारमध्ये अनेक कामगार आहेत ज्यांना १२-१२ तास राबवून घेतले जाते आणि एक वडापाव देऊन, ८ तासांचा पगार देत फसवणुक, पिळणुक केली जात आहे. त्यात वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी पक्षाच्या वर्चस्वाचा फायदा घेत अनेक मालक संघटनांचे अध्यक्ष बहुजन विकास आघाडीचे नेते आहेत आणि कामगार संघटनांचे अध्यक्षही बहुजन विकास आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे येथील अनके कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची पिळवणुक होत आहे. त्यामुळे मी कामगारांच्या प्रश्नांवर कार्य करण्यासाठी, पिळवणुक थांबण्यासाठी धडक कामगार युनियनच्या माध्यमातून नेतृत्त्व स्वीकारत समाजभावनेतून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करेन व अभिजीत राणे यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती सत्यात उतरवेन.

त्यामुळे वसई विरार, पालघरमधील अनेक कामगारांच्या हक्कासाठीही धडक कामगार युनियन आता काम करणार आहे. राज्याचे एकमेव यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे या युनियनचे प्रेरणास्थान असून धडक कामगार युनियन चे आज महाराष्ट्रभरात 10 लाखांहून अधिक मेम्बरर्स आहेत. कामगार नेते अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या युनियनचे हजारो कंपन्यांमध्ये जाळे आहे. कामगारांना न्याय देणारी एकमेव अशी प्रतिष्ठित युनियन म्हणून आज महाराष्ट्रात भरात या युनियनची ख्याती आहे.

यावेळी वरिष्ठ पत्रकार बी के पांडे, नेहा दुबे तसेच किरण भोईर, महेंद्र पाटील, पद्मा पाटील, अजित असताना, देवराज सिंग, नारायण मांजरेकर, अभय कक्कड, मनोज बारोट, सिद्धेश तावडे, प्रतीक चौधरी, रामानुजम आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ परब यांनी केले व आभार प्रदर्शन रमेश पांडे यांनी केले.












30 views0 comments

Comments


bottom of page