https://www.abhijeetrane.in/post/आरे-क-लनीतील-अनाधिकृत-स्टुडिओंवर-कारवाईसाठी-किरीट-सोमय्या-व-अभिजीत-राणे-यांची-संयुक्त-मागणी *आरे कॉलनीतील अनाधिकृत स्टुडिओंवर कारवाईसाठी किरीट सोमय्या व अभिजीत राणे या
- dhadakkamgarunion0
- Jun 28
- 1 min read
*आरे कॉलनीतील अनाधिकृत स्टुडिओंवर कारवाईसाठी किरीट सोमय्या व अभिजीत राणे यांची संयुक्त मागणी*
‘‘आरे कॉलनी येथे होणारा अतिक्रमण, बेकायदेशीर भरणी, डेब्रिज टाकने, जमीन बळकवणे व मोठ्या प्रमाणात अनाधिकृत फिल्म स्टुडिओ बांधणे या संदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या समवेत भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी स्वतः आरे कॉलनीतील परिसराची पाहणी केली होती. आरे कॉलनी परिसरात न्यायालयाचे निर्देश असताना ही गेल्या अनेक महिने अशा प्रकारची बांधकामे सुरू आहे हे चिंतेची बाब असल्याचे मत यावेळी किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले होते.
ताबडतोब या अनाधिकृत फिल्म स्टुडिओ वर कारवाई व्हावी’’ असे पत्र किरीट सोमय्या यांच्या स्वाक्षरीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान च्या वनसंरक्षक व संचालक अनिता पाटील (भा. व. से.) यांच्या नावे काढण्यात आले असून, भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी ते आज अनिता पाटील यांना दिले व तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्या सोबत धडक वन विभाग चे अध्यक्ष जॉनी वायके उपस्थित होते.
#kiritsomayya #forest #maharashtraforest #mumbai #abhijeetrane #AR #Aareycolony #goregaon #DKU #film #shooting

Comments