top of page

Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union's name Board opening at Borivali Station

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या गेट नं.2, बोरीवली रेल्वे स्टेशन (पूर्व), मुंबई येथे मीटर रिक्शा स्टॅण्डचे नाम फलकाचे मोठ्या दिमाखात अनावरण संपन्न...

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातुन मालाड पूर्व येथील लोकांसाठी मीटर रिक्शाची सुविधा

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्यावतीने मुंबई उपनगरातील प्रवाश्यांच्या सेवेसाठी रिक्शा स्टॅण्डची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात असुन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडुन जनतेची गरज ओळखून धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने केलेल्या मागण्यांना उत्तम प्रकारे सहकार्य मिळत आहे. मुंबई उपनगरात गेल्या 50 वर्षात ज्याठिकाणी रिक्शा स्टॅण्ड झाले नाहीत, त्या ठिकाणी शेअरींग रिक्शा स्टॅण्डची व मिटर रिक्शा स्टॅण्डची निर्मिती करुन धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने प्रवासी जनतेला दिलासा दिला आहे.

बेरीवली रेल्वेस्टेशन (पूर्व), मुंबई येथे धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते रविवार दि. 24 ऑटोबर, 2021 रोजी मीटर रिक्शा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. या रिक्शा स्टॅण्डमुळे बोरीवली येथील प्रवाश्यांना दिलासा मिळाला असुन प्रवासी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

उद्घाटन समारंभाला धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे अमजद पठान (मुंबई उपाध्यक्ष - टॅक्सी विभाग), सूनिल राजपूत (स्टेशन कमिटी अध्यक्ष), उपाध्यक्ष -प्रशांत दळवी, सचित - मारुती गीड्डे, उपसचिव - संजय झवके, खजिनदार - अरविंद मोरे, उपखजिनदार - गणेश नायकोन्य, संतोष घोणे, लालू पटेल व अन्य सभासद पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



























37 views0 comments
bottom of page