top of page

Dhadak Auto Rickshaw Meter Stand Board opening at Malvani by Prominent Labour Leader Abhijeet Rane

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या टीपू सुल्तान मालवणी विभाग कमिटी मीटर रिक्शा स्टॅण्ड नाम फलकाचे मोठ्या दिमाखात अनावरण संपन्न...

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातुन मालवणी येथील लोकांसाठी मिटर रिक्शाची सुविधा

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्यावतीने मुंबई उपनगरातील प्रवाश्यांच्या सेवेसाठी रिक्शा स्टॅण्डची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात असुन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडुन जनतेची गरज ओळखून धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने केलेल्या मागण्यांना उत्तम प्रकारे सहकार्य मिळत आहे. मुंबई उपनगरात गेल्या 50 वर्षात ज्याठिकाणी रिक्शा स्टॅण्ड झाले नाहीत, त्या ठिकाणी शेअरींग रिक्शा स्टॅण्डची व मिटर रिक्शा स्टॅण्डची निर्मिती करुन धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने प्रवासी जनतेला दिलासा दिला आहे.

लगुन रोड, कच्चा रस्ता, झुणका भाकर समोर, मालवणी मालाड पश्चिम, मुंबई येथे धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते मंगळवार, दि. 8 जून, 2021 रोजी मिटर रिक्शा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. या रिक्शा स्टॅण्डमुळे मालवणी येथील प्रवाश्यांना दिलासा मिळाला असुन प्रवासी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

उद्घाटन समारंभाला धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई उपाध्यक्ष मोहम्मद जुबेर मेमन, कमिटी अध्यक्ष अब्दुल पटेल, कमिटी उपाध्यक्ष अब्दुल हमीद व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



























6 views0 comments

Comments


bottom of page