Bhartiy Janta Majdoor Sangh Karyakarta visited Dhadak Kamgar Union office
- dkusocial
- Feb 7, 2021
- 1 min read
विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची भारतीय जनता मजदूर संघाचे कार्यकर्ते व पदाधिका-यांनी त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कामगार युनियन ही महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, नागपूर, जालना, सांगली, भुसावळ, रायगड, पालघर व इतर
विविध जिल्हयांमध्ये कार्यरत आहे. भारतीय जनता मजदूर संघाचे कार्यकर्ते व पदाधिका-यांनी धुळे जिल्हयातील कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करुन श्री अभिजीत राणे यांचे मार्गदर्शन घेतले. या वेळी राजू चव्हाण ( अभिजीत राणे युथ फाउंडेशन -महाराष्ट्र उपाध्यक्ष ) उपस्थित होते.


Comments