top of page

Abhijeet Rane Your Foundation demands to give Covid vaccine to Jain Sages on priority basis

जैन साधू-साध्वीचे लसीकरण करा

अभिजीत राणे युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून मागणी

ओळखपत्राशिवाय लसीकरण करण्याचे अभिजीत राणेंकडून राज्य सरकारला साकडे


मुंबई

सध्या नागरिकांसाठी करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असले तरी त्यातील नियम व अटींमुळे सर्व धर्मांचे साधु-संत वंचित राहिले आहेत. मुंबईतील सर्वधर्मीय साधुसंत आणि जैन मुनींचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणीपर विनंती अभिजीत राणे युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत राणे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.

अभिजीत राणे हे अभिजीत राणे युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. गरजवंतांना मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे. विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव म्हणून अनेक कामगारांना, संस्थांना न्याय, हक्क मिळवून देण्याचे काम ते करीत आहेत. कोविड काळातही त्यांनी गेल्या वर्षभरापासून अनेक गरजूना सढळ हस्ते मदत केली आहे. इतकेच नव्हे तर आता मुंबईतील जैन साधू साध्वी यांचे लसीकरण विना ओळखपत्राशिवाय करण्यात यावे अशी मागणी राज्याच्या आरोग्य विभागाकडे केली आहे.

राज्यात ठिकठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या सर्व धर्मीय साधुसंतांना तातडीने कोविड लसीकरण करणे गरजेचे आहे. मात्र कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करताना पॅन कार्ड अथवा आधारकार्ड पुरावा म्हणून ग्राह््य धरला जातो. मात्र, साधु हे सर्वत्र फिरत असतात व त्यांचा कायमचा पत्ता नसतो. त्यामुळे त्यांच्याकडे आधारकार्ड नसते. त्यामुळे त्यांना ओळखपत्राशिवाय लस देण्यासाठी धोरण तयार करावे, अशी विनंती अभिजीत राणे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

9 views0 comments

Comments


bottom of page