संपकरी एसटी कामगारांचा तिढा सोडवावा अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलने होतील कामगार नेते अभिजीत राणे
संपकरी एसटी कामगारांचा तिढा सोडवावा
अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलने होतील
विख्यात कामगार नेते अभिजीत राणेंनी दिला आघाडी सरकारला इशारा
धडक कामगार युनियन आणि सेंन्चुरी मिल कामगार एकता मंच पाठीशी
मुंबई
एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी गेल्या ९ दिवसांपासून कामबंद आंदोलन करताहेत. मागील 9 दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण अजूनही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. तर मुंबईत आझाद मैदान येथे एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून आज रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी सेंन्चुरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर, सेक्रेटरी हेमंत गोसावी यांच्यासह जाऊन भेट घेतली आणि या संपला आपला पाठिंबा दर्शवला, एस टी, कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात अन्यथा भविष्यात या संपाचे विपरीत परिणाम पाहायला मिळतील असा इशारा दिला.
एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून संपावर ठाम आहेत. विलनीकरणासाठी शासनाकडे साकडे घालत आहेत. मात्र शासन त्यांच्या मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची पाळी आणली आहे हे अतिशय निंदनीय आहे अशी नाराजी विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी व्यक्त केली. आज अभिजीत राणे यांनी आझाद मैदान येथील संपस्थळी जाऊन संपकर्त्या एसटी कामगारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर सेंन्चुरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर, सेक्रेटरी हेमंत गोसावी हे देखील उपथित होते. अभिजीत राणे यांनी धडक कामगार युनियनचा एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा जाहीर केला त्याचबरोबर गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सेंन्चुरी मिल कामगार एकता मंचनेही आपले समर्थन दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आघाडी सरकार न्याय देऊ शकत तर संपूर्ण महाराष्ट्रात गिरणी आणि एसटी कामगार यांचे संघटन हाणून लढा उभा करण्याचा निर्णय धडक कामगार युनियन आणि सेंन्चुरी मिल कामगार एकता मंच घेईल असा इशाराही दिला आहे.
यावेळी उपस्थित ५०० कामगारांना मास्क आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या भेटीदरम्यान दैनिक मुंबई मित्र तसेत वास्ट मिडीया प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ अमोल राणे यांच्यासह धडक कामगार युनियनचे खजिनदार प्रकाश पवार, विन्स्टन परेरा (महाराष्ट्र सचिव - धडक माथाडी जनरल कामगार युनियन), बबन आगडे (मुंबई उपाध्यक्ष व नवी मुंबई ठाणे निरीक्षक), विपीन सिंग, हुसेन पटेल, सुरज मांडवकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.















































































