● *संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे वन कामगारांसाठी धडक कामगार युनियनचा ‘जनसंवाद’ व ‘मोफत छत्री वाटप’ कार्यक्रम उत्साहात संपन्न!* ----● बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते शुभारंभ तर भ
- dhadakkamgarunion0
- Jun 17
- 2 min read
● *संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे वन कामगारांसाठी धडक कामगार युनियनचा ‘जनसंवाद’ व ‘मोफत छत्री वाटप’ कार्यक्रम उत्साहात संपन्न!* ----● बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते शुभारंभ तर भाजपा माजी खासदार गोपाळ शेट्टी व कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न!----बोरिवली: धडक कामगार युनियनच्या वतीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवलीतील युनियनच्या वन कामगार सभासदांसाठी जनसंवाद व मोफत छत्री वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचा शुभारंभ बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून भाजपा ज्येष्ठ नेते व माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी उपस्थिती लावली, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून धडक कामगार युनियनचे संस्थापक व महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी वन कामगारांशी थेट संवाद साधला. युनिटचे अध्यक्ष जॉनी वायके यांनी संजय उपाध्याय यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.संजय उपाध्याय यांनी यावेळी बोलताना, वन कामगार हे पर्यावरणाच्या रक्षणाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेणारी आणि त्यावर उपाय शोधणारी संघटना म्हणजे धडक कामगार युनियन. मी अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाचे अभिनंदन करतो. प्रत्येकजण आपल्या प्रसिध्दीसाठी स्वतःचे फोटो टाकून छात्री वाटप करतो परंतू, अभिजीत राणे यांनी आज दिलेल्या छत्र्यांमधून समजते की, ते हे कार्य दिखावासाठी नाही तर आपल्या वन कामगारांसाठी करतात.गोपाळ शेट्टी यांनी आपल्या भाषणात सांगितले, कामगारांसाठी निःस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या अशा संघटनांची आज गरज आहे. अभिजीत राणे यांनी वन कामगारांसाठी उभारलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. अभिजीत राणे यांनी वन कामगारांशी थेट संवाद साधताना म्हटले, "सामान्य वन कामगारांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं, त्यांना छोट्या-सोप्या पण उपयोगी सुविधा देणं हेच आमच्या युनियनचं कार्यधर्म आहे. आजचं छत्री वाटप हे त्याच कार्याचा एक छोटासा भाग आहे.कार्यक्रमात वन कामगार युनियनच्या सर्व सभासदांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. यावेळी विविध पदाधिकारी आणि महिलांसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन जॉनी वायके – अध्यक्ष, रमेश धुरी – सचिव, भगवान तांदुळकर – खजिनदार, दिनेश चव्हाण – उपाध्यक्ष, तेजाबाई सुर्यवंशी – सहसचिव, प्रकाश नारकर – सहखजिनदार, मंजूळा ताई पवार, पार्वती ताई ऊराडे, दिपाली ताई थोरात – सदस्य मनिषा शैलेंद्र सावंत – राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र निरीक्षक यांनी केले. यावेळी युनियनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाने वन कामगारांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला असून, अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली धडक कामगार युनियनच्या कामगिरीची एक सकारात्मक छाप पुन्हा एकदा उमटली आहे.#DhadakUnion #ForestWorkersMeet #BorivaliSGNP #AbhijeetRane #WorkersUnity #JanSamvad #FreeUmbrellaDistribution #LabourLeader #UnionForWorkers #SolidarityWithForestWorkers #SanjayGandhiNationalPark #WorkerWelfare #DhadakForWorkers
Comments