संजय गांधी उद्यानातील कामगारांना मिळणार थकीत वेतन
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रयत्नांना आले यश
वन संचालक जी मल्लिकार्जुनांकडून मिळाले आश्वासन
मुंबई
बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील तुळशी रेंज, एल. एस.पी. रेंज, के. यु. बी. रेंज, येऊर रेंज मधील कामगारांचे पगार मागील दोन महिन्यापासून थकलेले आहेत. या कामगारांचा थकलेला पगार त्वरित मिळवून देण्यासाठी त्याचबरोबर ज्या कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे त्यांना त्वरित कामावर रुजू करण्यात यावे यासाठी विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली आज कामगार प्रशासनाविरोधात आंदोलन करणार होते. मात्र बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन संरक्षक व संचालक जी मल्लिकार्जुन यांनी सर्व कामगारांचे थकीत वेतन त्यांना लगेच देणार असे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन झाले नाही मात्र आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अभिजीत राणे यांनी कामगारांच्यावतीने दिला.
बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील तुंगारेश्वर रेंजमधील कामगारांचे मागील दोन महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. यासाठी आज सोमवारी विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन संरक्षक व संचालक वन संरक्षक व संचालक जी मल्लिकार्जुन यांची भेट घेतली. या भेटीत अभिजीत राणे यांनी धडक कामगार युनियनचे नेतृत्व स्वीकारलेल्या कामगारांचा २ महिन्यांचा थकीत पगार लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी केली आहे. वारंवार विनंती करूनही कामगारांना पगार वेळेवर मिळत नाही....गरीब कामगारांवर उपासमारीची वेळ त्यांच्यासह कुटुंबियांवर आली आहे. त्यांचा हा थकीत पगार लवकरात लवकर मिळवून देण्यात यावा अशी मागणी केली आहे. या मागणीची पूर्तता करण्याचे जी मल्लिकार्जुन यांनी दुजोरा देत मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यामुळे करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र कामगारांच्या मागण्या पूर्ण न करण्यात आल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अभिजीत राणे यांनी दिला आहे.











Comments