◆ वसई-विरार परिसरातील नाका कामगारांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा: कामगार नेते अभिजीत राणे
◆ वसई-विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांना दिले निवेदन!
◆ कामगार नेते अभिजीत राणे व अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांच्यात नाका कामगारांवर झाली सकारात्मक चर्चा!
वसई: धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे अति आयुक्त आशिष पाटील यांना वसई-विरार मधील नाका कामगारांच्या समस्यांसंदर्भात निवेदन दिले यावेळी सोबत युनियन जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष विशाल मोरे, पत्रकार बी. के. पांडे आदी उपस्थित होते. अभिजीत राणे व आशिष पाटील यांच्यामध्ये नाका कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी पाटील यांनी नाका कामगारांच्या समस्या लवकरात लवकर तडीस सोडवल्या जातील. असे यावेळी ते म्हणाले.
निवेदनाच्या माध्यमातून, वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात के टी व्हिजन जवळ नाका, पंचवटी नाका वसई (प.), वसई माणिकपूर नाका, रेंज ऑफिस नाका वसई (पू.), विरार पूर्व टोटाळे तलाव, नालासोपारा पूर्व स्टेशन परिसर, धानिव, पेल्हार, वालीव, तुंगारेश्वर नाका आदी नाक्यांवर मोठ्या प्रमाणात गवंडी, मेस्त्री, सुतार, मदतनीस, नळजोडणी कारागीर, इलेक्ट्रिशन आदी अनेक असंघटीत नाका कामगार उभे असतात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व कामगार पालघर, बोईसर, डहाणू, वाडा, जव्हार, मोखाडा परिसरातून वसई-विरार परिसरात येतात. ह्या कामगारांसाठी हे नाके म्हणजेच एकप्रकारचे रोजगाराचे मुख्य साधन असून ह्या नाक्यांवर सुविधांची वानवा आहे.
मिळालेल्या महितीकडून असे समजले की, वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात औद्योगिक वसाहत येत असून या नाक्यासंबंधी व नाका कामगारांची कोणतीही माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही ही बाब खेदजनक आहे.
असंघटित कामगारांच्या बाबतीत पालिकेने लक्ष देऊन नाका कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, बसण्यासाठी शेड, तसेच केंद्र सरकारने दिलेल्या सर्व योजनांचा लाभ या कामगारांना मिळणे गरजेचे आहे असे सांगितले.
Comments