वसई विधानसभेच्या नवनियुक्त आमदार स्नेहा दुबे पंडीत यांची त्यांच्या घरी येथे आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष व धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचा शाल पुष्पगुच्छ व श्रीगणेशाची मूर्ती देऊन अभिनंदन केले, यावेळी सोबत त्यांचे पती नवीन दुबे व धडक कामगार युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते.
धडक कामगार युनियन ने स्नेहा दुबे पंडीत यांना विधानसभा निवडणूकीत पाठिंबा जाहीर केला होता. स्वतः अभिजीत राणे यांनी वसईतील औद्योगिक वसाहतीत युनियन सभासदांच्या चौक बैठका तसेच व्हिडीओच्या माध्यमातून स्नेहा दुबे पंडीत यांच्यासाठी सर्व कामगारांना आवाहन केले होते. त्यांच्यावतीने आज अभिजीत राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Comments