मुंबई, गोरेगाव वनराई उत्कर्ष समाज मंदिर संस्थेमार्फत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गोरेगाव येथील वनराई उत्कर्ष समाजमंदिर सभागृहात भव्य दिवाळी ग्राहक पेठ विक्री प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. दिनांक
- dhadakkamgarunion0
- Oct 19
- 1 min read
मुंबई, गोरेगाव वनराई उत्कर्ष समाज मंदिर संस्थेमार्फत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गोरेगाव येथील वनराई उत्कर्ष समाजमंदिर सभागृहात भव्य दिवाळी ग्राहक पेठ विक्री प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. दिनांक ११ व १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत भरविण्यात आलेल्या या ग्राहक पेठेत स्थानिक रहिवासी व लघु उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गेल्या १५ वर्षांपासून या संस्थेच्या वतीने 'ग्राहक हिताय, ग्राहक सुखाय' या उदात्त हेतूने ग्राहक पेठ आयोजित केली जाते. स्थानिक लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे, महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे व नागरिकांना किफायतशीर दरात दर्जेदार गृहपयोगी वस्तू मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या ग्राहक पेठेचे उद्घाटन अभिजीत राणे (संस्थापक, धडक कामगार युनियन व पत्रकार), बिग बॉस फेम हेमा शर्मा, महेंद्र झगडे (अध्यक्ष, आरे भाजपा मंडळ) व राजेंद्र
पवार (मुखी, संत निरंकारी मंडळ, बिंबीसारनगर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना अभिजित राणे यांनी सांगितले की, "स्थानिक उद्योजक आणि स्वयंरोजगार करणाऱ्या नागरिकांना अशा माध्यमातून प्रोत्साहन देणे म्हणजे सम ाजाच्या आर्थिक उन्नतीचा पाया मजबूत करणे होय. लघु उद्योग आणि महिला उद्योजकांना असा व्यासपीठ मिळणे ही सामाजिक जबाबदारी आहे आणि वनराई उत्कर्ष सम ाजमंदिर संस्थेचे हे कार्य अनुकरणीय आहे."
या कार्यक्रमाला संतोष मेढेकर (भाजपा उत्तर-पश्चिम जिल्हा माजी अध्यक्ष व विद्यमान जिल्हा समन्वयक), रवींद्र तिवारी, शरद हिरस्कर, विजय गुरव, मधुकर कांबळे, संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डी. डी. सावंत, सचिव संजय चामे, खजिनदार मनोहर कदम, तसेच अरुण गोसावी, राजेंद्र चौधरी, वनमाला दैवज्ञ, दिपाली शिंदे, हेमंत सावंत, परेश बाडकर, विश्वास चिले, आणि अनिल गावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.














































Comments