मुंबईतील शहरांमध्ये बेकायदेशीर गॅस सिलेंडरची विक्री जोरात असून, सरकारी दरापेक्षा कमी दरात हा गॅस विक्रीला जात आहे. गॅस वितरणासाठी लागणारा शासकीय परवाना अथवा अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र (एन.ओ.सी
- dhadakkamgarunion0
- Jul 1
- 1 min read
मुंबईतील शहरांमध्ये बेकायदेशीर गॅस सिलेंडरची विक्री जोरात असून, सरकारी दरापेक्षा कमी दरात हा गॅस विक्रीला जात आहे. गॅस वितरणासाठी लागणारा शासकीय परवाना अथवा अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र (एन.ओ.सी.) एक्सप्लोझिव्ह लायसन्स नसूनही हे खाजगी गॅस विक्रेते खुलेआम दुकानाबाहेर अथवा फुटपाथवर सिलेंडरची रास रचून विकत आहे. यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा जी.एस.टी. बुडत असून शासनमान्य अधिकृत गॅस वितरण करणाऱ्या गॅस एजन्सीच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. दुकानाबाहेर अथवा फुटपाथवर होणाऱ्या या अनधिकृत गॅस सिलेंडर विक्रीमुळे, एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. अंधेरी परिसरात तर एका 30 वर्षे जुन्या सी.एन.जी. गाडीमधून गॅस सिलेंडर वाहून नेले जात असल्याचे खळबळजनक पुरावे ‘दै.मुंबई मित्र’च्या हाती लागले. रस्त्यावरही या ‘जिवंत बॉम्ब’ वर अन्न व नागरी पुरवठा ग्राहक विभाग विभाग व मुंबई पोलीस कारवाई का करत नाही? हा मोठा यक्ष प्रश्न आहे. अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव परिसरातील अनधिकृत गॅस विक्रेत्यांची स्फोटक माहिती देणारे पत्र देण्यात आले होते.
याबाबतीत धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त महेश पाटील यांची "धडक गॅस एजेन्सी युनिट"च्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी वरील विषयांवर चर्चा झाली व महेश पाटील यांनी लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
#LPGMumbai, #GasCylinderMumbai, #MumbaiGasConnection #LPGMumbai, #GasCylinderMumbai, #MumbaiGasConnection, and #IndaneMumbai #IndaneMumbai



Comentarios