top of page
dhadakkamgarunion0

महिला रिक्षा चालकांची बजाज फायनान्सकडून होणारी पिळवणूक तात्काळ थांबवा

◆ महिला रिक्षा चालकांची बजाज फायनान्सकडून होणारी पिळवणूक तात्काळ थांबवा

◆ धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे वसई बजाज फायनान्स कार्यालयास निवेदन

वसई: धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव व वसई-विरार सचिव उदय शेट्टी, कमलेश पांचाळ यांनी बजाज फायनान्सच्या वसई कार्यालयास 'धडक' दिली. यावेळी धडक ऑटो-रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन कडून वसई, बजाज फायनान्स कार्यालयास समस्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्याप्रमाणात बजाज फायनान्सकडून त्रास दिले गेलेले रिक्षा चालक-मालक उपस्थित होते. कुणाल जाधव यांनी यावेळी, महिलांचे घरचे पत्ते यांच्याकडे असून ही गंभीरबाब असल्याचे बजाज फायनान्सच्या लक्षात आणून दिले. उदय शेट्टी यांनी यावेळी चर्चा करताना, वसई-विरार मध्ये रिकव्हरी साठी कोणाला काम दिले आहे त्याची नोंद आपल्या कडे आहे का? तसेच रिकव्हरी करणारे कोण आहेत कुठे राहतात त्यांना माहिती कोण पुरवते? अनेक महिलांचे नंबर यांच्याकडे असतात. भर रस्त्यात गाडी अडवणे, चार-पाच जण मिळून महिलांना घेराव घालणे, रात्री अपरात्री गाडी थांबवणे, गाडीची चावी खेचणे असे प्रकार होत असून त्यांच्या कडे ना आयडी कार्ड आहे ना ते त्यांचे नाव सांगतात. आदी प्रश्न विचारले. यावर आश्चर्यकारक म्हणजे बजाज फायनान्स कार्यालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. यावर त्यांनी लवकरच सर्व माहिती आम्ही वरिष्ठ वर्गास कळवून लवकरच मिटिंग करण्याची ग्वाही बजाज फायनान्स कडून देण्यात आली. बैठकी दरम्यान, शलाका नागवेकर, संदीप हंबीर, संतोष घाटाळ, गौरी रहाटे , सोमनाथ तरे , प्रदीप पोटले, दीप्ती मोरे, कमलेश पांचाळ, गणेश रहाटे, महेश बाबर, विकी बाबर, प्रशांत जाधव, अविनाश अहिरे, पवन मानके, मंगेश पवार, प्रवीण आदमाने आदी रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.









48 views0 comments

Recent Posts

See All

コメント


bottom of page