भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सोबत मागील आठवड्यात भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे कॉलनीतील परिसराचा दौरा केल्यानंतर आज याबाबतीत, ‘‘आरे कॉलनी येथे होणारा अतिक्रमण, बेकायदेशीर
- dhadakkamgarunion0
- Jun 26
- 1 min read
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सोबत मागील आठवड्यात भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे कॉलनीतील परिसराचा दौरा केल्यानंतर आज याबाबतीत, ‘‘आरे कॉलनी येथे होणारा अतिक्रमण, बेकायदेशीर भरणी, डेब्रिज टाकने, जमीन बळकवणे व मोठ्या प्रमाणात अनाधिकृत फिल्म स्टुडिओ बांधणे या संदर्भात चर्चा केली. मी स्वतः आरे कॉलनीतील परिसराची पाहणी केली 40/50 फुटी उंचीचा हजारो वर्ग फूट मोठे फिल्म शूटिंग स्टुडिओ पाहिले. एवढे मोठे स्टुडिओ हे नो डेव्हलपमेंट परिसरात, आरे कॉलनी परिसरात ज्यावेळी न्यायालयाचे ही निर्देश असताना गेल्या अनेक महिने सुरू आहे हे चिंतेची बाब आहे.
ताबडतोब या अनाधिकृत फिल्म स्टुडिओ वर कारवाई व्हावी विनंती.’’ असे पत्र किरीट सोमय्या यांच्या स्वाक्षरीने पी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या नावे काढण्यात आले असून, भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी पी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त अजय पाटणे यांना ते दिले व तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
Commentaires