● *भाजपा गोरेगाव विधानसभेकडून ‘सदस्य अभियान २०२५’ची आढावा बैठक संपन्न!* *-----* राज्यभरात भाजपाकडून सुरु असलेल्या ‘सदस्यता महा अभियान २०२५’ ची भरतीय जनता पार्टी गोरेगाव विधानसभेकडून आज भाजपा महाराष्ट्
- dhadakkamgarunion0
- Feb 28
- 1 min read
● *भाजपा गोरेगाव विधानसभेकडून ‘सदस्य अभियान २०२५’ची आढावा बैठक संपन्न!*
*-----*
राज्यभरात भाजपाकडून सुरु असलेल्या ‘सदस्यता महा अभियान २०२५’ ची भरतीय जनता पार्टी गोरेगाव विधानसभेकडून आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर, भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे, माजी नगरसेविका श्रीकला पिल्ले आदींच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
भारतीय जनता पार्टीच्या सदस्य अभियानाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुंबई अध्यक्ष अशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई व महाराष्ट्र्रात या सदस्य अभियानाने जोर पकडला आहे. संघटन पर्व अंतर्गत होणारी सदस्य मोहीम ही पक्षाला दिशा देण्याचे काम करीत आहे. आपल्या विभागातील प्रत्येक बूथ सशक्त करण्याच्या दृष्टीने सदस्यता मोहीम जास्तीत जास्त वेगाने करण्याची अधिक आवश्यकता आहे, असे आवाहन भाजपा महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपा संघटन पर्व मुंबई, ठाणे आणि कोकण विभागीय कार्यशाळेत केले होते. त्या पार्श्वभुमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली.
#BJP4IND #bjpmahararashtra #BjpMumbai #DevendraFadnavis #CMOMaharashtra #RavindraChavan #AshishShelar #jayprakashthakur #chandrashekarbawankhule #abhijeetrane #BJPMembership





Comments