बजाज फायनान्सची मुजोरी मोडून काढणार धडकच्या रिक्षा टॅक्सी चालकांवर गुंडगिरी खपवून घेणार नाही
बजाज फायनान्सची मुजोरी मोडून काढणार
धडकच्या रिक्षा टॅक्सी चालकांवर गुंडगिरी खपवून घेणार नाही
विख्यात कामगार नेते अभिजीत राणेंनी दिला खरमरीत इशारा
मुंबई
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे नेतृत्व स्वीकारलेल्या ऑटो रिक्षा चालकांना नाहक त्रास देणाऱ्या बजाज फायनान्सची मुजोरी मोडून काढून रिक्षा चालकांना न्याय देण्याचा निर्णय विख्यात कामगार नेते, धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी बजाज फायनान्सच्या व्यव्यस्थापनाबरोबर चर्चा केली असता लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगत यापुढे धडकच्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना त्रास देणार नसल्याचे आश्वासन दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, लॉकडाउनच्या काळात धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांनी बजाज फायनान्सकडून कर्ज घेतले आहे. यातील काही रिक्षा चालकांनी कर्ज फेडले आहे. तर काहींची कर्ज फेडण्याची मुदत शिल्लक असताना बजाज फायनान्सच्या कर्ज वसूल करणाऱ्या नियुक्त माणसांकडून धडकच्या रिक्षा चालकांना अडवून गुंडगिरीने कर्ज फेडण्यासाठी धमकावले जात आहे. रिक्षा जप्त करण्याची धमकी दिली जात आहे. रिक्षा चालकांनी यासंदर्भात धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्यापुढे तक्रारीत मांडल्या असता त्यांनी बजाजच्या व्यवस्थापकांबरोबर तात्काळ बैठक घेत ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना नाहक त्रास देणे बंद करा अन्यथा परिणाम वाईट होतील असा धमकीवजा इशारा दिला. यावर बजाजच्या व्यवस्थापनाकडून ज्या ज्या रिक्षा चालकांना असा त्रास देण्यात आला आहे अशा प्रत्येक १० जणांच्या तक्रारी आमच्याकडे पाठवा ....या तक्रारींची पडताळणी करण्यात येईल.....त्यांना यापुढे आमच्याकडून त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले.
















