धडक दिव्यांगमूकबधिर कामगारयुनियन चे शिष्टमंडळ घेणार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियन चे शिष्टमंडळ घेणार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट!
धडक कामगार युनियन अंतर्गत धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियन चे युनिट अध्यक्ष महेश पवार यांनी आज मुंबई महानगरपालिकेकडून बाकी महानगरपालिकांपेक्षा दिली जाणारी सापत्न वागणूक व योजनांची न होणारी पूर्तता या संदर्भात युनियन चे सर्वेसर्वा संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट घेऊन निवेदन सुपुर्त केले. यावेळी लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊ असे आश्वासन त्यांनी युनिटच्या पदाधिकाऱ्यांना दिले.









