धडक'च्या वन कर्मचाऱ्यांसोबत स्थानिक बैठका सुरू! धडक कामगार युनियन ची आंदोलनाच्या दिशेने वाटचाल

◆ *'धडक'च्या वन कर्मचाऱ्यांसोबत स्थानिक बैठका सुरू!*

◆ *धडक कामगार युनियन ची आंदोलनाच्या दिशेने वाटचाल*

डहाणू : धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवड्यात झालेल्या आंदोलनानंतर कामावरून काढलेल्या 30 कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर घेण्यात आले. त्याचा परिणाम पाहता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वन खात्यात कामगारांच्या संदर्भात होत असलेल्या अन्याया संदर्भात तक्रारी प्राप्त होऊ लागल्या व धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व कामगारांकडून घेण्यात येत असून कामगार नेते अभिजीत राणे यांनी स्थानिक बैठका सुरू केल्याअसून आज पालघर परिसरात बैठक घेण्यात आली. यावेळी डहाणू क्षेत्रातील अनेक कामगारांनी आज धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व स्वीकारले. कामगार नेते अभिजीत राणे यांनी बोलताना, ही प्रत्येक कामगाराची लढाई असून प्रत्येकाने एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आपल्या आजच्या सुरु असलेल्या स्थानिक बैठकांचे रूपांतर भविष्यात आपल्याला एक मोठ्या आंदोलना करायचे असून आपली एकजूट कायम ठेवा. असे यावेळी ते म्हणाले. यावेळी वास्ट मीडियाचे सीईओ अमोल राणे, धडक कामगार युनियन डहाणू युनिटचे अध्यक्ष जॉनी वायके, सचिव रमेश धुरी,कार्यालय अध्यक्ष भगवान तांदुलकर, युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, मीरा- भाईंदर जिल्हाध्यक्ष विशाल मोरे, पत्रकार रमेश पांडे आदी उपस्थित होते.


7 views0 comments