धडक कामगार युनियन विरुध्द हसमुख एंड पीजी कंपनी व्यवस्थापनाविरोधातील आंदोलनाचा दिवस तिसरा!
- dhadakkamgarunion0
- Nov 19, 2021
- 2 min read
धडक कामगार युनियन विरुध्द हसमुख एंड पीजी कंपनी व्यवस्थापनाविरोधातील आंदोलनाचा दिवस तिसरा!
--------------------------
संप यशस्वी होणारच! : कामगार नेते अभिजीत राणे
------------------------
कामगार उप आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा
हसमुख एंड पीजी कंपनीतील धडक कामगार युनियनच्या मार्गदर्शनाखाली कामगारांद्वारा सुरु असलेल्या संपाचा आज तिसरा दिवस असून वांद्रे येथील कामगार उप आयुक्त कार्यालयात कामगार नेते अभिजीत राणे कामगार व कंपनी प्रशासना सोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. बैठाकीनंतर अभिजीत राणे यांनी कामगारांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी ‘संप यशस्वी होणारच!’ अशी ग्वाही दिली. कामगारांच्या मागण्यांकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष खपवून घेणार नाही. मागील ३ वर्षांपासून कामगारांच्या मागण्या मान्य न करता त्यांच्या भावनांशी प्रशासनकडून खेळले जात आहे. कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा कायम राहील असा कडक इशारा धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिला.
सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यालयात विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक सदस्य एकत्र आले आणि या दरम्यान संपाबाबत चर्चा-विचारविमश करण्यात आले. युनियनचे स्थानिक अध्यक्ष सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या ३ वर्षांपासून हसमुख एंड पीजी कंपनीतील धडक कामगार युनियनच्या कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. व्यवस्थापनाकडून कामगारांना त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत. धडकच्या कामगारांच्या वेतन भत्ता आणि अन्य सुविधांच्या मागण्यांकडे कानाडोळा केला जात आहे. महत्वाचे म्हणजे आम्ही यापूर्वीच व्यवस्थापनाला चार्टर ऑफ डिमांड दिले असल्याने जोपर्यंत व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत संप सुरूच राहील. धडक कामगार युनियनच्या आरे कॉलनी गोरेगाव स्थित मुख्यालयात उपस्थित युनियनच्या कामगारांना विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात येतील असे आश्वासन दिले. हसमुखाच्या व्यवस्थापनाकडून जोपर्यंत धडकच्या कामगारांना न्याय मिळत नाही....त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असे आश्वासन अभिजीत राणे यांनी दिले. या बैठकीला धडक कामगार युनियनचे पदाधिकार्यांसह शेकडो कामगार उपस्थित होते.






























Комментарии