डहाणू वन कर्मचाऱ्यांचा उपवनसंरक्षक कार्यालयावर 'धडक' मोर्चा
◆ डहाणू वन कर्मचाऱ्यांचा उपवनसंरक्षक कार्यालयावर 'धडक' मोर्चा
-------------------
◆ कामगार नेते अभिजीत राणे यांच्या अध्यक्षतेखाली वन कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण!
-------------------
डहाणू : धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व घेतलेल्या डहाणू वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आज उपवनसंरक्षक कार्यालयावर 'धडक' मोर्चा काढला. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू युनिट अध्यक्ष जॉनी वायके, सचिव रमेश धुरी, कार्यालय अध्यक्ष भगवान तंदुलकर , युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, वसई-विरार जिल्हा सचिव रमेश पांडे, नितीन खेतले आदी यावेळी उपस्थित होते.
कामगारांनी 'कोण म्हणतो देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही', "धडक कामगार युनियन जिंदाबाद" अशा घोषणांनी डहाणू उपवनसंरक्षक कार्यालय दणाणून सोडले. कोरोना त्रिसूत्रीचे सर्व नियमपाळून आंदोलन पार पडले. यावेळी अभिजीत राणे यांनी सर्व कामगारांसोबत बसून त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या व धडक कामगार युनियनचे शिष्टमंडळ व डहाणू उपवनसंरक्षक विजय भिसे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली यावेळी दहिसर वनक्षेत्रपाल नम्रता हिरे, भाताणे वनक्षेत्रपाल स्वप्नील साळुंके, कासा सहाय्यक वनसंरक्षक जे. जे. कोऱ्हाळे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कामावरून काढलेल्या वन कामगारांना येत्या 1 नोव्हेंबरपासून कामावर तात्काळ चढवले जाईल याची ग्वाही प्रशासनाकडून युनियन शिष्टमंडळास देण्यात आली. काही कामगारांना 3 महिन्याच्या स्वरूपात पगार दिले जात होते तो प्रकार ही तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक वन कर्मचाऱ्याचा तब्बल 16 महिने पगार प्रशासनाकडून दिला जात नव्हता त्याबाबतीत त्वरित पगार देण्याचे बैठकीत ठरले.
धडक कामगार युनियकडून प्रशासना विरुद्ध ठाणे कामगार न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याचा निकाल हा धडक कामगार युनियनच्या बाजूने लागल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने धडक कामगार युनियनकडून आंदोलन करण्यात आले होते.
बैठकीनंतर कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी उपस्थित कामगारांना संबोधित करताना, प्रशासनाने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्याअसून त्याबद्दल मी प्रशासनाचे आभावर मानतो व प्रशासनाने भविष्यात न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. कामगारांनी अशी एकजूट कायम ठेवावी असे यावेळी ते म्हणाले.





























































