गोरेगाव (पूर्व) स्थानक ते आरे कॉलनीतील मयूर नगरपर्यंत धावणारी बेस्टची बस क्रमांक 452 ही बस रस्त्याचे काम सुरू असल्याच्या कारणास्तव युनिट क्र.6 वरूनच यूटर्न मारायची. आता रस्त्याचे काम पूर्ण होऊनही व मय
- dhadakkamgarunion0
- Aug 2
- 1 min read
गोरेगाव (पूर्व) स्थानक ते आरे कॉलनीतील मयूर नगरपर्यंत धावणारी बेस्टची बस क्रमांक 452 ही बस रस्त्याचे काम सुरू असल्याच्या कारणास्तव युनिट क्र.6 वरूनच यूटर्न मारायची. आता रस्त्याचे काम पूर्ण होऊनही व मयूर नगर पर्यंत वाहतूक सुरळीत होऊन सुद्धा ही बस अद्यापही युनिट क्र.6 येथूनच वळवली जात आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना सुमारे दोन अडीच किलोमीटर पायी चालत जावे लागते. ही बस पूर्ववत मयूर नगरपर्यंत सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप आरे मंडळाचे अध्यक्ष महेंद्र झगडे, पत्रकार नितीन तोरस्कर, रविंद्र तिवारी, शरद हिरस्कर, उमेश तिवारी, चंदू सिंग आदी पदाधिका-यांचे शिष्टमंडळ यांनी दिंडोशी डेपोचे महाव्यवस्थापक शिरोडकर यांची भेट घेतली व मागणी केली यावेळी काही दिवसांत बस सेवा पुन्हा मयूर नगर पर्यंत सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
#abhijeetrane #aarey #best #bestbus #photo #bjp #bjpmumbai #dindoshi #dindoshibusdepo #mumbai #goregaon















Comments