top of page

गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष

गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष

गेले अनेक दिवस आघाडी सरकारचा राजकिय तमाशा पाहून जनतेत प्रचंड संताप आहे, करोना महामारित,अनेकांची बळी जाऊन कुटुंबच्या कुटुंब ऊध्वस्त झाली, अनेकांच्या नोक-या गेल्यात, शेतकरी हवालदिल झाला आहे,महिलांच्यावरील अत्याचार थांबत नाहीत भ्रष्टाचार प्रकरणे रोज बाहेर निघताआहेत ,ज्या गिरणी कामगारांना देशोधडीला लावले ते राजकिय मंडळी सत्तेत राहून मलिदा चाटण्यात व्यस्त आहेत

मराठी माणसांच्या नावावर सत्ताउपभोगत असलेल्या नेत्यांना गिरणी कामगारांचा एक सवाल आहे ,ज्या गिरणी कामगारांनी आपले संपुर्ण बलीदान देऊन औद्योदिक मुंबई विकसीत केली ,संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठ्या संख्येनी मराठी गिरणी कामगारांनी बलिदान दिले आहे सामाजिक बांधीलकी असलेल्या मराठी लाभार्थी गिरणी कामगारांची घेरे दलालांच्या माध्यमातून परप्रांतीयांना राजरोष पणे विकली जात आहेत

याचीअनेक वेळा तक्रार करूणही आघाडी सरकार याला आळा का घालित नाही ?

गेले तीस वर्षे गिरणी कामगार आपल्या हक्काच्या घरासाठी लढतो आहे त्याचे वय सध्या 70ते80 वर्षे झाली आहेत अर्धे गिरणी कामगार स्वर्गवाशी झाले तरीही महाराष्ट्रातील गिरणी कामगारांनी किती सय्यम धरायच ? चर्चेतून प्रश्न सोडविण्यासाठी आघाडी सरकारला वेळ नाही पण राजकिय स्टंट बाजी करणारे मराठी नेते पाहाताना जनतेला यांची आता लाजवाटते आहे ,समाज कारण कुठेच दिसतच नाही,या सर्व गोष्टीला कंटाळून पश्चीम महाराष्ट्रातील गिरणी कामगार नेते आज सेंन्चुरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर सेक्रेटरी हेमंत गोसावी व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजित राणे साहेबांच्या बरोबर संयुक्त पणे आमचा लढा तिव्र करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे लाखोच्या संख्येनी आम्ही गिरणी आमगार आपल्या बरोबर येणार हा निर्णय घेण्यात आला ,

संपूर्ण ताकतीनी धडक कामगार युनियन गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी लढाऊ गिरणी कामगार नेते नंदू पारकर ,हेमंत गोसावी यांच्या बरोबर संयुक्त पणे लवकरच संघर्ष ऊभा करणार

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव आभिजित राणे साहेब यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन कामगार नेत्यांचे स्वागत केले .

लवकरच विरोधी पक्ष नेते (माजी मुख्यमंत्री)देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर मिटींगचे आयोजन करून कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जाऊन गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी तिव्र आंदोलनाची रणनीती ठरवण्यात येणार आहे

पश्चिम महाराष्ट्रातून कामगार नेते गणपत भोसले ,रविंद्र शिंदे,नथु सराटे ,शिरिष पवार ,शिवीजी काळे ,..

आनंदराव घोरपडे,शंकर यादव ,सुमन जाधव,आनंदराव यादव, जयवंत पवार , मिटींगला उपस्थीत होते .

483 views0 comments

Comments


bottom of page