top of page

कार्निवल सिनेमाच्या कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्वती विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी चर्चा

कार्निवल सिनेमाच्या कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्वती

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी केली व्यवस्थापनाशी चर्चा

कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार नाही असे दिले आश्वासन

मुंबई

कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर आता राज्य सरकारनं महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केलीय. त्यानुसार राज्यातील शाळा आणि मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळं सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापाठोपाठ आता राज्यातील सिनेमागृह सुरु करण्यासही राज्य सरकारनं संमती दिली आहे. येत्या 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह सुरु होणार आहेत त्यादृष्टीने विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी युनियन असलेल्या गोरेगाव पूर्व स्थित कार्निव्हल सिनेमाच्या व्यवस्थापनाबरोबर बैठक घेऊन कामगारांच्या हिताविषयी चर्चा केली.

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे गोरेगाव पूर्व येथील कार्निवल सिनेमाच्या व्यवस्थापनाबरोबर मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीदरम्यान कार्निवल सिनेमाचे सी.ई.ओ कुणाल सहानी, एच.आर. मॅनेजर निलेश चांदोले यांच्याशी कामगारांना कामावर ठेवणार वा नाही याविषयी विचारपूस केली. यावेळी त्यांनी जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याविषयी मेलद्वारे पत्र पाठवले आहे. मात्र राज्य सरकारने नेमून दिलेल्या नियमानुसार लसीकरणाचे दोन डोस घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. तर नवीन कर्मचाऱ्यांना परिस्थिती पाहून हळहळू कामावर बोलावण्यात येईल, त्यांच्या नोकरीवर गदा येणार नाही असे सांगितले. ही बैठक कार्निवल सिनेमाच्या गोरेगाव पूर्व स्थित मुख्यालयात पार पडली. यावेळी कार्निवल सिनेमाचे युनियनचे नेतृत्व स्वीकारलेले कर्मचारी वर्ग, युनियनचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

यानंतर अभिजीत राणे यांनी कंत्राटदार इनोव्हसोर्स सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्या विक्रोळी कार्यालयात यासंदर्भात एच आर श्रुती राजपूत यांच्याशी भेट घेतली. यावेळी श्रुती राजपूत यांनी राज्य सरकारने महाराष्ट्रातील ३ आणि मुंबईतील २ सिनेमागृह सुरु ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार आम्ही देखील तयारीला लागलो आहोत. कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार नाही असे आश्वासनदेखील दिले आहे.

14 views0 comments

Comments


bottom of page