◆ कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतली सहाय्यक कामगार आयुक्तांची भेट!
◆ मे. मायक्रो न्यूमॅटिक प्रा. लि.च्या कामगारांवर होत असलेल्या समस्यांची शासन पातळीवर नोंद
बोईसर : धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मे. मायक्रो न्यूमॅटिक प्रा. लि.च्या युनियन सदस्य कामगारांसाठी मंगळवारी बोईसर येथील कामगार उपायुक्त कार्यालयाच्या नियोजित बैठकीस हजेरी लावली. कामगार नेते अभिजीत राणे व सहाय्यक कामगार आयुक्त कानडे यांच्या यावेळी चर्चा झाली. युनियनकडून कामगारांच्या सर्व समस्यांची शासन पातळीवर नोंद घेण्यात आली.
यामध्ये खास करून युनियनचे सदस्य असलेल्या कामगार व कर्मचाऱ्यांना काढणार नाही अशी औद्योगिक न्यायालयात हमी दिली होती तरीही 2 कामगारांना काढण्यात आले आहे. युनियनचे सदस्य असलेल्यांना जाणीव पूर्वक टार्गेट केले जात आहे. तसेच काही महिलांना कंपनी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे त्याच्या युनियनकडे असलेल्या तक्रारी. काही कामगारांना त्रास देण्यासाठी अंतर्गत बदल्या केल्या जात आहेत. यापूर्वी जबरदस्ती प्रशासनाने युनियनचा राजीनामा कामगारांकडून लिहून घेतलेला प्रकार. ज्या कामगारांना कामावरून काढले त्यांनी युनियनकडे दिलेल्या तक्रारी आदी सर्वबाबींची नोंद कामगार उपायुक्त कार्यालयात घेण्यात आली.
यावेळी यावेळी युनिटचे उपाध्यक्ष अजित नाईक व काही कामगार तसेच युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते.
धडक कामगार युनियन (जनसंपर्क कक्ष)




















Comments