◆ कामगार नेते अभिजीत राणेंनी घेतील स्टेशन मास्टर यांची भेट!
◆ वसई स्टेशन हमाल वर्गाच्या समस्यांसंदर्भात दिले निवेदन
◆ वसईतील हमाल वर्गाने घेतले धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व
वसई : वसई रेल्वे स्टेशनवरील हमाल वर्गाने धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व स्वीकारल्यानंतर आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे व युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार, जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव यांनी वसई स्टेशन मास्टर यांची भेट घेतली यावेळी सकारात्मक चर्चा केली व समस्यांचे निवेदन दिले.
यावेळी युनियनचे वसई-विरार जिल्हा सचिव रमेश पांडे, वसई (पू.) सचिव संजय सिंग, संदीप करोटीया व हमाल वर्ग आदी उपस्थित होते.
निवेदनाच्या माध्यमातून, हमाल कामगार वर्ग अनेक वास्तविक मुलभूत हक्कांपासून वंचीत असल्याचे एकंदरीत चित्र त्यांच्या सोबत झालेल्या चर्चेतून जाणवले असे त्यांनी सांगितले तसेच, लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्टेशन हमाल वर्गास विश्रांती गृह असून वसई रेल्वे स्टेशन वरील हमाल वर्गास तशी कोणतीही सोय नाही. रात्री अप रात्री अपघात झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास त्यांना अतिशय महत्त्वाचे आणण्याचे काम हाच हमाल वर्ग करतो. परंतू याचे त्यांना प्रत्येकी फक्त 100 रुपये असे तुटपुंजे मानधन दिले जाते, ते वाढवणे काळाची गरज आहे व तो त्यांचा हक्क आहे. मागील 15 ते 20 वर्ष अनेक हमाल वसई स्टेशन वर काम करत असून त्यांना अजून ही लायसन्स दिले गेलेले नाही. वसई रेल्वे स्टेशनकडून यापूर्वी दिले जाणार आय डी कार्ड मागील 3-4 वर्षांपासून दिले गेलेले नाही. अनेक वेळा हमाल वर्गाकडे प्रवाशांकडून आय-डी कार्ड मागितले जाते. परंतू ते त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रवाशांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. मागील 3 वर्षांपासून एकही हमाल वर्गास गणवेश दिला गेलेला नाही. बाकी रेल्वे स्टेशनवर असलेल्या लॉकर प्रमाणे वसई रेल्वे स्टेशनवरही हमाल वर्गास लॉकरची सोय करून द्यावी. आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
Comments