“ऑपरेशन सिंदूर” या महत्वपूर्ण घटनेच्या निमित्ताने गोरेगाव येथे आयोजित करण्यात आली होती, यावेळी गोरेगाव च्या आमदार विद्या ठाकूर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जय प्रकाश ठाकूर व भाजपा मुंबई उपाध्यक
- dhadakkamgarunion0
- May 27
- 1 min read
“ऑपरेशन सिंदूर” या महत्वपूर्ण घटनेच्या निमित्ताने गोरेगाव येथे आयोजित करण्यात आली होती, यावेळी गोरेगाव च्या आमदार विद्या ठाकूर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जय प्रकाश ठाकूर व भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हूणन उपस्थिती लावली.
अभिजीत राणे या तिरंगा यात्रे बाबत बोलताना, हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर आपल्या राष्ट्रप्रेमाचा, एकतेचा आणि सामर्थ्याचा सजीव उत्सव आहे. "ऑपरेशन सिंदूर" हे नावच आपल्या हृदयात गर्व, वीरता आणि बलिदानाची भावना जागवते. आपल्या भारतीय सशस्त्र दलांनी दाखवलेली धैर्यगाथा, कठोर परिश्रम, आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी दिलेला घाम आणि जीव – याचा गौरव करण्यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे.
या यात्रेचा उद्देश आहे, देशभक्तीची भावना नवीन पिढीमध्ये रुजवणे, सैन्यदलाच्या पराक्रमाबद्दल जागरूकता वाढवणे, आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश प्रत्येक गल्लीत पोचवणे. असे यावेळी ते म्हणाले.
#OperationSindoor #goregaon #abhijeetrane #vidyaThakur #ऑपरेशनसिंदूर #तिरंगायात्रा #भारताच्यावीरांनासलाम #VandeMataram #जयहिंद





































Comments